जरांगेंवर कुणाची पाळत? आंदोलनस्थळी आणि घरावर ड्रोनने टेहाळणी ; काय आहे नेमकं प्रकरण?
जरांगेंवर कुणाची पाळत? आंदोलनस्थळी आणि घरावर ड्रोनने टेहाळणी ; काय आहे नेमकं प्रकरण?
img
Dipali Ghadwaje
मराठा आंदोलक मनोज जरांगे राहत असलेल्या ठिकाणी ड्रोनने टेहाळणी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनस्थळासह जरांगे राहतात त्या घरावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी मध्ये काल मध्यरात्री ड्रोन कॅमेरा द्वारे टेहाळणी होत असल्याच समोर आलं आहे. 

जालना- मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या घरावर ड्रोनद्वारे टेहळणी होत असल्याचं समोर आलं आहे. गावाच्या सरपंचानी यासंदर्भातील माहिती दिली आहे. याप्रकरणी गावाचे सरपंच पोलिसांकडे तक्रार करणार असल्याची माहिती मिळत आहे.

तीन दिवसांपूर्वी देखील अशा पद्धतीने ड्रोन गावात पाहायला मिळाला होता असं सांगण्यात आलं आहे. मनोज जरांगे हे आंतरवाली सराटी येथे सरपंचाच्या घरी मुक्कामासाठी आहेत. यावेळी सरपंचाच्या घरावर ड्रोन घिरट्या घालत आहे. गावाच्या सरपंचांनी फोनवरून याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अंतरवाली सराटीमध्ये २६ जूनला ड्रोन घिरट्या घालत असल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यानंतर सोमवारी मध्यरात्री आणखी दोन ड्रोन गावावर घिरट्या घालत होते. गावाच्या सरपंच कौशल्याबाई तारख आहेत. याच ठिकाणी मनोज जरांगे मुक्कामी आहेत. त्यांच्या घराच्या परिसरात ड्रोन घिरट्या घालत आहे. एक ड्रोन गावामध्ये घिरट्या घालत होता.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंतरवाली सराटी हे गाव प्रसिद्ध झालं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे केंद्र हे गाव बनलं आहे. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही टेहळणी केली जात आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. या सर्व प्रकारामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. रात्री काही गावकरी जागून पाहारा ठेवत आहेत. पोलिसांना याबाबत अद्याप काही सुगावा लागलेला नाही. त्यामुळे ड्रोनचं गुढ कायम आहे. 

सहा तारखेपासून मनोज जरांगे यांची शांती यात्रा सुरू होणार आहे. त्याआधीच हा टेहळणीचा प्रकार समोर आला आहे. ड्रोनद्वारे टेहळणी कोण करतंय असा खरा प्रश्न आहे. पोलीस यासंदर्भात काय कारवाई करतात हे देखील पाहावं लागणार आहे.










इतर बातम्या
Join Whatsapp Group