जरांगेंच्या आंदोलनातील महिलांना तडीपारीची नोटीस, सकल मराठा समाजाकडून निषेध
जरांगेंच्या आंदोलनातील महिलांना तडीपारीची नोटीस, सकल मराठा समाजाकडून निषेध
img
दैनिक भ्रमर
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या तीव्र आंदोलनादरम्यान अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. यातील हल्ला, जाळपोळ असे गंभीर स्वरुपाते गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असे विधान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर मनोज जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली होती. 

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सकल मराठा समाजाने आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांची एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे. अशावेळी अचानक मराठा आंदोलकांचे जुने गुन्हे काढून हद्द पारीची कार्यवाही करणे सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय. 

हिंगोली लोकसभा मतदार संघातील उमरखेड येथील मराठा महिला कार्यकर्त्या सरोज देशमुख यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. यवतमाळ,वाशीम आणि नांदेड जिल्ह्यातून त्यांना 2 वर्षासाठी तडीपार करण्यात येत असल्याचे  नोटीशीत म्हटलंय. उमरखेड एसडीओ यांनी  मराठा महिला कार्यकर्त्या सरोज देशमुख ही नोटीस पाठीवली आहे. 

कोण आहेत सरोजनी देशमुख?
प्रत्येक मतदारसंघातून एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरावयचा अशी संकल्पना मनोज जरांगेनी मांडली होती. या संकल्पनेतील इच्छूक उमेदवारांपैकी सरोजनी देशमुख या एक होत्या. त्यांच्यावर 353 सह विविध चार गुन्हे दाखल आहेत. निवडणूक काळात त्या शांतता सुव्यवस्थेचा भंग करून दंगल घडवतील असा ठपका या नोटीसमध्ये ठेवण्यात आलाय. हेतुपुरस्सर सरोजनी देशमुख यांच्यावर केलेल्या कारवाईचा हिंगोली येथील सकल मराठा समाजाने निषेध केलाय.

इतर बातम्या
Join Whatsapp Group