मराठा आंदोलनात मोठी फूट! मनोज जरांगेंवर त्यांच्याच विश्वासू जोडीदाराकडून गंभीर आरोप
मराठा आंदोलनात मोठी फूट! मनोज जरांगेंवर त्यांच्याच विश्वासू जोडीदाराकडून गंभीर आरोप
img
Dipali Ghadwaje
मराठा आंदोलनाचा प्रश्न सरकारने जवळपास मार्गी लावला आहे. मराठा आरक्षणाचे विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांकडून मंजूर झाले आहे. राज्य सरकारने  मराठा आरक्षणाबाबत बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देणार कायदा विधीमंडळात पास करण्यात आला. मराठा समाज विजयाचा जल्लोष साजरा करत असतानाच मराठा आंदोलनात उभी फुट पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

काय म्हणाले बारसकर?
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणातील महत्त्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारसकर यांनी आज पत्रकार परिषद घेत मनोज जरांगेवर मोठे आरोप केले आहेत. मनोज जरांगे रोज पलटी मारतात, खोटं बोलतात, असा गंभीर स्वरूपाचा आरोप बारसकर यांनी केला आहे.

यावेळी बोलताना बारसकर म्हणाले, जरांगे पाटील हेकेखोर आहेत. त्यांनी मराठ्यांना उद्ध्वस्त केलं आहे. जरांगे लोकांची फसवणूक करत आहेत. जरांगे यांना बोलताना भान राहत नाही असंही असंही बारसकर यांनी पुढे म्हटलं आहे.
 
मनोज जरांगे यांनी बंद खोलीत बैठका केल्या. जरांगे यांच्या बैठका रात्री होतात. त्यांनी लोकांची फसवणूक केली आहे असा आरोपही बारसकर यांनी केला आहे.

मी जरांगेंच्या प्रत्येक कृतीला साक्षीदार आहे. मी प्रसिध्दीसाठी किंवा पैशासाठी आरोप करत आहे असं नाहीये. मी कीर्तनाचे देखील पैसे घेत नाही. आताच हे का झालं? काही दिवसांपासून माझ्या मनातील खदखद व्यक्त केली.

दरम्यान बोलताना ते असंही म्हणाले की, जरांगेच्या मागे अदृष्य शक्तींचा हात आहे. वाशी आणि लोणावळ्यात मी नव्हतो पण बंद खोलीत काय झालं मला ठाऊक आहे. जरांगे वारंवार आपली मागणी बदलत असल्याचा आरोप बारसकर  यांनी केला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group