
१९ ऑगस्ट २०२३
नाशिक (प्रतिनिधी) :- सोने-चांदीचे आर्कषक व सुंदर दागिने घडविणाऱ्या व विक्री करण्यासाठी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या 'आर. एल. ज्वेलर्स' तथा राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या नाशिकसह राज्यातील सहा पेढ्यांवर काल ईडीने छापेमारी केली आहे.
स्टेट बँकेकडून घेतलेल्या आणि थकीत कर्जाच्या संदर्भात ईडी पथकाने नाशिकसह राज्यातील सहा ठिकाणच्या पेढ्यांवर छापे टाकल्याची माहिती मिळत आहे. माजी खासदार ईश्वरलाल जैन आणि माजी आमदार मनीष जैन यांच्या मालकीच्या असलेल्या अत्यंत प्रसिद्ध पेढीवरील या छापेमारीमुळे सुवर्ण नगरीत मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे जळगावच्या सुवर्ण नगरीत मोठी खळबळ उडाली आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या नाशिक, मुंबईसह राज्यातील 6 ठिकाणी शाखा आहेत.
काल सकाळी सात वाजल्यापासून राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या जळगाव, नाशिक, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणच्या फर्म्सवर स्वतंत्र ईडी पथकांनी छापेमारी केली. दरम्यान, या प्रकरणी सर्व ठिकाणी मालमत्ता आणि कागदपत्रांची तपासणी सुरु केल्याची माहिती मिळाली आहे. या कारवाईमध्ये ईडीचे सुमारे 60 कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले.
स्टेट बँकेकडून घेतलेल्या सहाशे कोटी रुपयांच्या थकीत कर्ज विषयक ही कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. मागील वर्षीसुद्धा सीबीआयने राजमल लखीचंद ज्वेलर्सचे चौकशी केली होती. चौकशीअंती नेमकी काय कारवाई करण्यात येणार आहे याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
Copyright ©2025 Bhramar