लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून शरद पवार बैठका आणि सभांच्या नियोजनात व्यस्त होते.
महाविकास आघाडीची मोट बांधताना अनेकदा बैठकांसाठी तेच केंद्रबिंदू राहिले आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या सभाही झाल्या
शरद पवार यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे उद्या दि. 6 मे रोजीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. उद्या कात्रज येथील नियोजित सभाही रद्द करण्यात आली असून याची सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी नोंद घ्यावी, अशी माहिती पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली आहे.