संतापजनक: जन्मदात्या आईनेच आपल्या नवजात बाळा  सोबत केलं असं काही .....
संतापजनक: जन्मदात्या आईनेच आपल्या नवजात बाळा सोबत केलं असं काही .....
img
Dipali Ghadwaje
 मुंबई : शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मुंबईच्या मुलुंड परिसरातुन एक संतापजनक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या ३९ दिवसांच्या बाळाला इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून खाली फेकलं. या घटनेत बाळाचा मृत्यू झाला आहे. ह्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही संतापजनक घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मुंबईच्या मुलुंड परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी बाळाच्या आईवर गुन्हा दाखल करत तिला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.  

हशवी संकेत मेहता असे मृत बाळाचे, तर मनाली मेहता असं आरोपी महिलेचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनाली मूळ गुजरातमधील सुरतची रहिवाशी आहे. काही दिवसांपूर्वी ती मुंबईतील मुलंड परिसरात आपल्या आईकडे राहण्यासाठी आली होती.

मनालीच्या पहिल्या बाळाचा जन्मानंतर ८ महिन्यातच मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांचे देखील निधन झाले होते. त्यामुळे मनाली तणावात होती. तिच्यावर मानसिक उपचार सुरू होते. दरम्यान, या तणावातून शुक्रवारी  पहाटेच्या सुमारास मनालीने आपल्या हशवीला इमारतीच्या १४ मजल्यावरून खाली फेकलं. या घटनेत हशवीचा जागीच मृत्यू झाला. 

दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आईनेच आपल्या बाळाला १४ व्या मजल्यावरून फेकल्याचं पोलीस तपासात उघड झालं. यानंतर पोलिसांनी मृत बाळाच्या आईवर गुन्हा दाखल करत तिला ताब्यात घेतलं आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group