अंधेरीतील इमारतीला भीषण आग...
अंधेरीतील इमारतीला भीषण आग...
img
Dipali Ghadwaje
मुंबई पश्चिम उपनगरातील ओशिवरा येथे आगीची घटना घडली आहे. ओशिवरा परिसरातील हिरा पन्ना मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. आग लागल्यानंतर आजूबाजूनच्या परिसरात नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.

आगीत काही लोक अडकल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. हिरा पन्ना मॉलमधील दुसऱ्या मजल्यावर अनेक कमर्शियल गाळे आहेत. या गाळ्यांमध्ये काम करणारे तसेच ऑफिस कर्मचारी यात अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

मॉलमध्ये दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग ही एल टू प्रकारची असून दुपारी साधारणपणे 3.10 वाजण्याच्या सुमारास मुंबई अग्निशमन दलाला याबाबत माहिती मिळाली होती. दुरूनही धुराचे लोट दिसत आहेत.

यानंतर मुंबई अग्निशमन दलाचे जवान आणि ओशिवरा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचले आगीवर नियंत्रण मिळण्याचं काम सुरु आहे. तसेच मॉलमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group