शिंदेंच्या शिवसेनेत मोठा बदल; शहराच्या प्रमुखपदी
शिंदेंच्या शिवसेनेत मोठा बदल; शहराच्या प्रमुखपदी "यांची" नियुक्ती
img
Jayshri Rajesh
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहर शिवसेना शिंदे गटात  मोठा बदल करणात आला आहे. शहर शिवसेनाप्रमुख दिलीप सातपुते यांना पदावरून हटविण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नगर शहराच्या प्रमुखपदी सचिन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपाशी हातमिळवणी केली. त्यानंतर पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाले. त्यानंतर दिलीप सातपुते यांची नगर शहरप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर संघटनेत खांदेपालट करण्यात आली आहे. 

सचिन जाधव यांची नगर शहरप्रमुखपदी नियुक्ती

संपर्क प्रमुखपदाची धुरा सांभाळणारे सचिन जाधव यांच्यावर नगर शहरप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एक वर्षासाठी ही नियुक्ती करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group