विधानसभा निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा महत्वाचा निर्णय
विधानसभा निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा महत्वाचा निर्णय
img
दैनिक भ्रमर
विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर  राज्य सरकारची जोरदार तयारी सुरु आहे. याच अनुषंगाने  6  अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेने  मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 36 विधानसभा मतदारसंघांसाठी मिळून एकूण सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. 

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय कामकाजाला वेग आला असताना, माननीय भारतीय निवडणूक आयोगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे.  त्याचप्रमाणे आता, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मदतीला एकूण सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. 

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील संपूर्ण क्षेत्र लक्षात घेतले तर ते मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा या दोन महसूल क्षेत्रात मोडते. मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा हे दोन जिल्हे मिळून म्हणजेच मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. 

यामध्ये मुंबई महानगरपालिकेतील चार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त तसेच मुंबई शहर जिल्हाधिकारी व मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी अशा सहा जणांचा समावेश आहे. या संदर्भातील आदेश महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने निर्गमित करण्यात आले आहेत. निवडणूक विषयक कामकाज सुनियोजित आणि सुलभ व्हावे, तसेच सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राहावे, या दृष्टीने या सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे. 

1 अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई शहर जिल्हाधिकारी

(विद्यमान जिल्हाधिकारी - श्री. संजय यादव)

(महसूल क्षेत्र - मुंबई शहर जिल्हा)

(लोकसभा मतदार संघ - दक्षिण मुंबई)

2 अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर)

(विद्यमान अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी)

(महसूल क्षेत्र- मुंबई शहर जिल्हा)
इतर बातम्या
Join Whatsapp Group