पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्ट रोजी जळगाव दौऱ्यावर; ''या'' महिलांना  करणार प्रमाणपत्रांचे वाटप
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्ट रोजी जळगाव दौऱ्यावर; ''या'' महिलांना करणार प्रमाणपत्रांचे वाटप
img
दैनिक भ्रमर
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्ट रोजी जळगाव दौऱ्यावर असणार आहेत . केंद्राच्या ‘लखपती दीदी’  योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यासाठी आणि कार्यक्रमादरम्यान महिला मेळाव्याला संबोधित करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्ट रोजी जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी काही लाभार्थींना शहराच्या सीमेवर असलेल्या जळगाव विमानतळाजवळील कार्यक्रमाच्या मैदानावर आमंत्रित केले जाणार आहे. या ठिकाणी त्यांना कार्यक्रमादरम्यान प्रमाणपत्रे दिली जातील, तर इतरांना त्यांच्या गावात प्रमाणपत्रे दिली जातील. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डीसीएम देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने आयोजित केला आहे.

यावेळी 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान 2500 कोटी रुपयांचा एक फिरता निधी- कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड जारी करतील, ज्याचा 4.3 लाख बचत गटांच्या  सुमारे 48 लाख सदस्यांना फायदा होईल. यावेळी पंतप्रधान 5000 कोटी रुपयांचे बँक कर्ज देखील जारी करतील, ज्यामुळे 2,35,400 बचत गटांच्या  25.8 लाख सदस्यांना फायदा होईल.

कोण आहे लखपती दीदी  

 लखपती दीदी या अशा महिला आहेत ज्या वार्षिक 1 लाख किंवा त्याहून अधिक कमावतात. या लखपती दीदींनी केवळ आपल्या कुटुंबांना गरिबीतून बाहेर काढले नाही, तर त्या समाजातील इतरांसाठी आदर्श बनत आहेत. ग्रामीण विकास मंत्रालयाने यापूर्वीच 1 कोटी लखपती दिदी तयार केल्या आहेत. आता सरकारचे लक्ष्य पुढील 3 वर्षांत 3 कोटी लखपती दीदी तयार करण्याचे आहे.

दरम्यान, पीएम मोदींच्या या जळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन, या मार्गावरील वाहतूक वळविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जळगाव विमानतळापासून 50 किलोमीटर क्षेत्र, 22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट नो 'नो फ्लाईंग झोन' असणार आहे. यासह 24 ऑगस्ट रात्री 8 पासून 25 ऑगस्ट संध्याकाळी 6 पर्यंत व्यावसायिक उड्डाणे राहणार आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group