महिलांनवर होणारे अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय, अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंबरनाथ येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची झाल्याची घटना घडली आहे.
अंबरनाथ येथे राहणारी 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी जात होती. तिला आरोपी रिक्षा चालकाने घरी सोडण्याच्या बहाण्याने रिक्षात बसवलं. त्यानंतर त्याने मुलीला मोरिवली डम्पिंग ग्राउंडवर घेऊन गेला. तिथे तिच्यावर अत्याचार केला. याबाबत घाबरलेल्या पीडितेने आपल्या पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर रिक्षा चालकावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
रिक्षा चालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेचा सविस्तर तपास सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे.