धक्कादायक  !  पतीने  मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून पत्नीने  उचललं टोकाचं पाऊल
धक्कादायक ! पतीने मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल
img
दैनिक भ्रमर
आज काल स्मार्ट  फोन  म्हणजे सर्वांचे जीव की  प्राण झाले आहे . जणू  काही मोबाइल म्हणजे आपल्या आयुष्यातला अनिवार्य घटकच बनला आहे. मोबाईल शिवाय आज काल  कोणी राहूच शकत नाही. दरम्यान मोबाइल चा अट्टाहास पुरवला नाही म्हणून एका महिलेने टोकाचं पॉल उचलल्याची धक्कदायक घटना घडली आहे . 

मोबाईलचा हट्ट न पुरवल्यामुळे पिंपरी- चिंचवड मध्ये पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. शिवानी गोपाल शर्मा अस आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. गेले काही दिवसांपासून शिवानी पतीकडे मोबाईलचा हट्ट करत होती. परंतु, पतीची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तो मोबाईल घेऊ शकत नव्हता. तरीही पती प्रयत्न करत होता. परंतु, या हट्टापायी शिवानीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

शिवानी ही अवघ्या 20 वर्षांची होती. लग्न होऊन काही दिवस झाल्यानंतर तिने पतीकडे स्मार्टफोन घेण्यासाठी तगादा लागला. पती गोपाल हा एका खासगी कंपनीत कामाला आहे. पैशांच्या अडचणीमुळे तो मोबाईल खरेदी करु शकत नव्हता. पण तरीही तो पत्नीचा हट्ट पुरवण्यासाठी प्रयत्न करत होता. आपण घरी एकटेच असतो, त्यामुळे आपल्याला मोबाईल खरेदी करुन द्यावा असा हट्ट ती सारखा धरत होती. हा हट्ट पूर्ण न झाल्याने बुधवारी शिवानीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पती जेव्हा नोकरीवरुन घरी आला. तेव्हा त्याला हादराच बसला. वाकड पोलिसांनी याविषयी चौकशी केल्यानंतर मोबाईलच्या हट्टासाठी तिने टोकाचे पाऊल उचल्याचे समोर आले.

याविषयी  अधिक माहिती अशी की , पती गोपाल नोकरीवरुन घरी आला. त्याने दरवाजा लोटताच पत्नीने गळफास घेतल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने आरडाओरड करत शेजाऱ्यांना बोलावले. पत्नीला वाचवण्यासाठी त्याने लागलीच जवळच्या दवाखान्यात धाव घेतली. पत्नी वाचेल असे त्याला वाटत होते. पण त्याची ही अखेरची धावाधाव कामी आली नाही. डॉक्टरांनी पत्नीला तपासून मृत घोषीत केले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group