पती-पत्नीचं भांडण, मत्रिणीवर खटला दाखल, कोर्टाने दिला ''हा'' महत्वपूर्ण निर्णय
पती-पत्नीचं भांडण, मत्रिणीवर खटला दाखल, कोर्टाने दिला ''हा'' महत्वपूर्ण निर्णय
img
दैनिक भ्रमर
पती पत्नीच्या विवादाला अनेक करणे कारणीभूत ठरतात. कधी कधी हे प्रकरण न्यायालयापर्यंत जाऊन पोहचतात दरम्यान, अशीच एक घटना समोर आली आहे . एका महिलेने असा आरोप केला, की पतीसोबतचं तिचं नातं उद्ध्वस्त करण्यासाठी तिच्या पतीची मैत्रीण कारणीभूत आहे. त्या महिलेच्या मैत्रिणीवर आयपीसीच्या कलम 498 ए (पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडून क्रूरता) अंतर्गत खटला दाखल करण्यात आला. 

दरम्यान ,  हायकोर्टाने आता या प्रकरणी महत्त्वाचा निकाल दिला आहे. न्यायमूर्ती अनीशकुमार गुप्ता यांच्या पीठाने असं स्पष्ट केलं, की कायद्यानुसार या कलमांतर्गत पतीच्या नातेवाईकांवर खटला दाखल केला जाऊ शकतो. पतीच्या मैत्रिणीचा त्यात समावेश होत नाही.

दरम्यान , पतीच्या मैत्रिणीवर होत असलेल्या कायदेशीर कारवाईसंदर्भात तिने (मैत्रिणीने) अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यात तिने असं म्हटलं आहे, की पती-पत्नीच्या भांडणात तिची काय चूक आहे?   प्रकरणावर महत्त्वाचा निकाल देत न्यायालयाने असं स्पष्ट केलं, की कायद्यानुसार या कलमांतर्गत पतीच्या नातेवाईकांवर खटला दाखल केला जाऊ शकतो. पतीच्या मैत्रिणीचा त्यात समावेश होत नाही. हायकोर्टाने सांगितलं, की ‘आयपीसीच्या कलम 498एमध्ये महिलेचा पती किंवा त्याच्या नातेवाईकांनी महिलेवर केलेल्या क्रूरतेच्या प्रकरणांचा समावेश होतो.’

या प्रकरणातल्या पतीच्या मैत्रिणीने कोर्टात धाव घेऊन याचिका दाखल केली आणि सांगितलं, की तिच्या जुन्या मित्राच्या पत्नीने त्या दोघांचा घटस्फोट होण्यासाठी ती (याचिकाकर्ती) जबाबदार असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्या दोघांच्या घटस्फोटाची याचिका तिच्या (याचिकाकर्तीच्या) सांगण्यावरून मित्राने कोर्टात दाखल केली होती, असा आरोप मित्राच्या पत्नीने केला होता; मात्र आता कोर्टाने दिलेल्या निकालानुसार कलम 498 ए आणि हुंडाप्रतिबंधक कायद्यानुसार त्या महिलेच्या (याचिकाकर्तीच्या) विरोधातली कारवाई रद्द करण्यात आली आहे. याचिकाकर्त्या महिलेने हायकोर्टात स्पष्ट केलं, की ती त्या महिलेच्या पतीची नातेवाईक नाही. ती कॉलेजच्या दिवसांमध्ये त्याची फक्त एक चांगली मैत्रीण होती.

कोर्टाने सांगितलं, की याचिकाकर्तीच्या विरोधात हुंड्याच्या मागणीसाठी त्रास दिल्याचा आरोप नाही. तसंच, मित्राच्या पत्नीला आत्महत्येला प्रवृत्त करणं किंवा तिच्या जिवाला धोका उत्पन्न करण्याचा आरोपही तिच्याविरुद्ध नाही. त्यामुळे या प्रकरणातली वस्तुस्थिती लक्षात घेता याचिकाकर्तीच्या विरोधात कलम 498 एनुसार कोणताही गुन्हा नाही.

कोर्टाने असंही स्पष्ट केलं, की हुंड्याप्रकरणी छळ करण्यासंदर्भातले मुद्देही या प्रकरणात लागू होणार नाहीत. कारण तसा काही आरोप यात केलेला नाही. शिवाय, पतीच्या मैत्रिणीला कोणत्याही प्रकारे हुंड्याची लाभार्थी मानता येणार नाही. पतीच्या मैत्रिणीने त्याच्या वैवाहिक जीवनात नाक खुपसल्याचा किंवा थेट हस्तक्षेप केल्याचा कोणताही आरोप नाही.

दरम्यान , हायकोर्टाने असा निष्कर्ष काढला, की पतीशी मैत्रिणीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून द्वेषभावनेने हा खटला दाखल करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी याचिकाकर्तीविरोधात दाखल केलेलं आरोपपत्र रद्द करण्यात येत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group