सध्या सोशिअल मीडिया चा जमाना असल्याने एखादी गोष्टीची कृती कशी करायची आहे हे जाणून घ्यायचे असेल तर यूट्यूबवर बघून लगेच आपल्याला ते करायला जमते कारण त्यावर सर्व प्रकारचे व्हिडिओ असतात परंतु कधीकधी याच यूट्यूबवर व्हिडीओ पाहून अनेकवेळा धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलेलं आहे. बिहार मधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे .
बिहारच्या सारण जिल्ह्यामध्ये एका डॉक्टरांनी यूट्यूबवर व्हिडीओ पाहून रुग्णाची शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरवर यूट्यूबवर व्हिडीओ पाहून शस्त्रक्रिया केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या संदर्भातील वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.
बिहारमधील सारण जिल्ह्यातील भुवलपूर गावातील चंदन साह यांनी आपल्या १५ वर्षीय मुलाला पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे गरखा मोतीराजपूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. यानंतर १५ वर्षीय मुलाच्या पित्त मूत्राशयाची शस्त्रक्रिया करावी लागेल असं संबंधित डॉक्टरने सांगितल्याचं चंदन साह यांनी म्हटलं आहे. त्यानंतर चंदन साह यांनी मान्य केलं आणि त्यांच्या मुलाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल केलं. त्यानंतर संबंधित डॉक्टरने यूट्यूबवर व्हिडीओ पाहून शस्त्रक्रिया केल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असल्याची माहिती सांगितली जात आहे.
शस्त्रक्रिया केल्यानंतर मुलाची प्रकृती बिघडल्याचं पाहून डॉक्टरही घाबरले. त्यानंतर मुलाला पाटणा येथील दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितलं. त्यासाठी डॉक्टरने रुग्णवाहिकेची व्यवस्थाही केली. मात्र, तोपर्यंत शस्त्रक्रिया केलेल्या मुलाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार मधौरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी घडला.
मृत मुलाच्या कुटुंबाने सांगितले की , डॉक्टरांनी मुलाची शस्त्रक्रिया करताना आपल्याला बाहेर काहीतरी कामानिमित्त पाठवलं होतं. यावेळात डॉक्टरने शस्त्रक्रिया या संदर्भात त. यूट्यूबवर व्हिडीओ पाहून शस्त्रक्रिया केल्याचा गंभीर आरोप केला आहे. शस्त्रक्रिया केल्यानंतर रक्तस्त्रावर थांबत नसल्यामुळे आणि मुलाची तब्येत खालावत चालल्यामुळे डॉक्टरने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात सांगितलं. मात्र, तो पर्यंत मुलाचा मृत्यू झाला. हे पाहून डॉक्टर पळून गेल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबांनी केला आहे.