मोठी बातमी !  अखेर एस टी कर्मचाऱ्यांचा संप मागे, सरकारने घेतला ''हा'' निर्णय
मोठी बातमी ! अखेर एस टी कर्मचाऱ्यांचा संप मागे, सरकारने घेतला ''हा'' निर्णय
img
दैनिक भ्रमर

एसटी कर्मचारी कृती समिती संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली होती, आज संपाचा दुसरा दिवस असून राज्यात प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळालं.राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाची हाक दिली होती. दरम्यान आता या पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे . एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडे सहा हजारांची वाढ केली आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला एसटी कामगार संयुक्त कृती समितीचं शिष्टमंडळ उपस्थित होतं. तसेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते, एसटी कष्टकरी जनसंघच्या जयश्री पाटील या देखील उपस्थित होत्या. मुख्यमंत्री एसटी कर्मचाऱ्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होणार का? याकडे राज्याचं लक्ष होतं. अखेर एकनाथ शिंदे यांना याबाबत मोठं यश आलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी 5000 रुपयांची वेतनात वाढ करण्याची मागणी केली होती. पण सरकारने तब्बल 6500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच माध्यमांना प्रतिक्रिया  देताना भाजप नेते गोपीचंद पडळकर म्हणाले, सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात सरसकट 6500 रुपयांची पगार वाढ केलेली आहे. ज्यांच्या पगारामध्ये 2021 पाच हजार रुपयांची वाढ झाली होती. त्यांच्या मूळ पगारामध्ये दीड हजार रुपयांची वाढ झालेली आहे. ज्यांना चार हजारांची वाढ दिली होती, त्यांच्या पगारामध्ये अडीच हजारांची वाढ झाली आहे. ज्यांना 2021 मध्ये अडीच हजारांची वाढ झाली होती, त्यांच्या पगारात 4 हजारांची वाढ झाली आहे. मी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या वतीने सरकारचे आभार व्यक्त करतो. सर्व संघटनांनी मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत केलं. महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की, तुम्ही जो उस्फुर्तपणे संप पुकारला. त्या संपाला सरकारने यश दिलेले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी उद्यापासून कामावर रुजू व्हावं, अशी तुम्हाला विनंती आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group