धक्कादायक कृत्य ! मुलानेच सुपारी देऊन केली वडिलांची हत्या
धक्कादायक कृत्य ! मुलानेच सुपारी देऊन केली वडिलांची हत्या
img
दैनिक भ्रमर
नांदेड शहरातील वाघी रोड भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या प्रकरणात मुलानेच आपल्या वडिलांची सुपारी देऊन हत्या घडविल्याची  खळबळजनक घटना घडली आहे . 

नांदेड शहरातील वाघी रोड भागात झालेल्या हॉटेल व्यावसायीकेच्या खुनाचा उलगडा झाला असुन मुलानेच आपल्या वडिलांच्या खुनाची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले. आईसोबत वडिलांचे रोजचे वाद व्हायचे. शिवाय वडिलांचे अनैतिक संबंध होते या रागातून मुलाने वडिलांची हत्या घडवली, असे पोलिस तपासात समोर आले.

या विषयी अधिक माहिती अशी  की , एक सप्टेंबर रोजी वाघी रोड येथे राहत्या घरी शेख युनूस यांचा खून झाला होता . अज्ञात मारेकऱ्यांनी पहाटे घरात घुसून खून केल्याची तक्रार मयत शेख युनूस यांचा मुलगा शेख यासेर यांनी पोलिसांना दिली होती. तपासादरम्यान पोलिसांना मुलावर संशय होता, अखेर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.

दरम्यान , आई सोबत रोजचे वाद आणि वडिलांचे बाहेर असलेले अनैतिक संबंध याच्या रागातून खून घडवल्याची कबुली शेख यासेर याने दिली. शेख अमजत आणि योगेश निकम यांना त्याने दोन लाखाची सुपारी देऊन वडिलांची हत्या घडवून आणली. तिघांना पोलीसांनी अटक केली आहे.
    
इतर बातम्या
Join Whatsapp Group