सध्या राज्यात गुन्हेगारी चे प्रमाण वाढत चालले आहे. दादागिरी , गुंडागर्दी यातून मारामाऱ्या जीवगघेणे हल्ले आणि हत्या याचेप्रमाण चिंता वाढविणारे आहे दरम्यान अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे . भर रस्त्यात एका व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. एक तरुण एका चारचाकी गाडीत बसलेल्या व्यक्तीला अतिशय अमानुषपणे मारहाण करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. जो इसम मारहाण करत आहे त्याला पीडित व्यक्तीची लहान मुलं, पत्नी अक्षरश: याचना करत होत्या. हा व्हिडीओ अतिशय धक्कादायक असून मन हेलावणारा आहे .
दरम्यान , संबंधित व्हिडीओ शिवसेना ठाकरे गटाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. मारहाण करणारा व्यक्ती हा शिवसेना शिंदे गटाचा आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. पण महेंद्र थोरवे यांनी मारहाण करणारी व्यक्ती हा आपला बॉडीगार्डी नाही तर दोन्ही व्यक्ती हे आपल्याच पक्षाचे कार्यकर्ते असल्याचं महेंद्र थोरवे यांनी मान्य केलं आहे. ठाकरे गटाकडून करण्यात आलेले आरोप हे चुकीचे असल्याचं महेंद्र थोरवे यांनी म्हटलं आहे.