भाजपचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलसोबत ठेका धरला. त्यांच्या नृत्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे. यावरूनच विरोधी पक्षाने टीकेची झोड उठवली आहे.
यवतमाळ येथे उमरखेडमध्ये भाजप आमदार नामदेव सासाने आणि भाजप समन्वयक नितीन भुतडा यांनी मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात गोपाळकाला उत्सावानिमित्ताने दहीहंडी महोत्सव आयोजित केला होता. या दहीहंडी महोत्सवात महाराष्ट्राची प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे नृत्य हे प्रमुख आकर्षण होते.
तसेच, संदीप धुर्वे म्हणाले, विरोधकांचं विरोध करणे हे काम आहे. या उबाठा आणि काँग्रेस सरकारने त्यांच्या कार्यकाळात दहीहंडीवर बंदी घातली होती. हिंदूंच्या सणावर बंदी घातली होती. ते आम्हाला काय शिकवणार? तिथे जनसमुदाय होता, तरुणाई होती. तिथल्या सर्व आयोजकांनी मला विनंती केली की, भाऊ आपण ठेका धरावा. आपण थोडं नाचावं. उत्तेजन दिल्यामुळे लोक खूश होतील. लोकांना, आयोजकांना, जनतेला खूश करण्यासाठी मी ठेका धरला.
तसेच ते पुढे म्हणाले की, गौतमी पाटील या महाराष्ट्रात नावाजलेल्या डान्सर आहेत. त्यांनाही मोह आवरला नाही. त्यांनीही माझ्यासोबत ठेका धरला. त्याच्यामध्ये वाईट काय आहे? दहिहंडी हिंदूंचा सण आहे, आम्ही साजरा केला. उरला शेतकऱ्यांचा प्रश्न मला वडेट्टीवारांना सांगायचंय की, यवतमाळमधील शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देणारा संदीप धुर्वेच आहे.