भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळल्यानंतर सरकारने दिले ''हे'' स्पष्टीकरण
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळल्यानंतर सरकारने दिले ''हे'' स्पष्टीकरण
img
दैनिक भ्रमर

भारतामध्ये एक मंकीपॉक्सची रुग्ण आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ निर्माण झाली आह . कोविदा  सारख्या विषाणूला देशाने मात दिली पण ह्या संसर्ग जाण्या रोगाने अनेक घर मोठ्या संकंटांचा सामना संपूर्ण देशाला करावं लागला होता. त्यांनतर अलीकडे आता कुठे तरी  सर्व विस्कळलेल  जनजीवन सुरळीत झालं  आणि त्यातच पुन्हा एकदा मंकीपॉक्स हा संसर्ग जन्य रोग डोकं वर काढू लागल्याचं  समजल्यावर सर्वाना धडकीच भरली. परंतु   सरकारने याबाबत भीतीचं कारण नसल्याचं स्पष्ट केलं आहे . 

काही दिवस आधी  भारतात  मंकीपॉक्सचा पहिलाच संशयित रुग्ण आढळल्याची माहिती रविवारी समोर आली होती. त्यावरून सर्वानाच पुन्हा एकदा धडकी भरली. पण सरकारने  याबाबत स्पष्टीकरण देत दिलासा दिला आहे . हा रुग्ण विलगिकरणात होता, असं सांगितलं आहे. त्यामुळे या रुग्णापासून संसर्ग वाढणार असल्याची खात्री सरकारने दिली आहे.

मंकीपॉक्स संक्रमणाच्या केसेस आढळत असलेल्या देशातून नुकतेच प्रवास केलेला एक तरुण हा मंकीपॉक्सचा संशयित  रुग्ण म्हणून डिटेक्ट झाला होता. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबद्दल माहिती दिली होती. या रुग्णाला रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले होते.

एमपॉक्सशी लढा देत असलेल्या देशातून परतलेल्या या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. डब्लूएचओने एमपॉक्सला ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी घोषित केले असून सध्या अनेक देशांमध्ये याची असंख्य प्रकरणे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात देखील अनेक दिवसांपासूनप्रशासनाकडून याबद्दल खबरदारी घेतली जात आहे. मात्र भारतात तशी परिस्थिती नाही, असं केंद्र सरकारने स्पष्ट
केलं आहे.

दरम्यान , आढळून आलेल्या रुग्णामध्ये पश्चिम आफ्रिकन क्लेड 2 हा एमपॉक्सचा विषाणू सापडला आहे. हे एक वेगळे प्रकरण असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पूर्वीही अशी 30 प्रकरण पुढे आलेली आहेत. सध्या डब्ल्यूएचओने जाहीर केलेली आणीबाणी क्लेड 1 शी संबंधित आहे, असंही सरकारने म्हटलंय
इतर बातम्या
Join Whatsapp Group