मोठी बातमी ! महाराष्ट्रात विधानसभा  निवडणुका कधी होणार? वाचा सविस्तर
मोठी बातमी ! महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? वाचा सविस्तर
img
दैनिक भ्रमर
विधानसभेच्या   पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु असून , महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक नेमक्या केव्हा होतील यावर सर्वांचे लक्ष लागले आहेत .  अलीकडेच जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान , केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबतही मोठी घोषणा केली आहे.निवडणुका लांबणीवर जाणार अशी चर्चा रंगली आहे. पण आता निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. आयोगाची एक टीम महाराष्ट्रात येणार असून निवडणुका वेळेवरच होणार अशी शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होण्यासाठी प्रयत्न सुरू असून ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणेचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निश्चित कार्यक्रम तयार केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची टीमचा महाराष्ट्र दौरा निश्चित झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही टीम महाराष्ट्रात येणार आहे. या टीममध्ये, 10 ते 12 केंद्रीय निवडणूक आयोग प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे.

विशेष म्हणजे, देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही सहआयुक्त या टीमचं नेतृत्व करणार आहेत. आगामी महाराष्ट्र निवडणूक कार्यक्रमावर ही टीम शिक्कामोर्तब करणार अशी शक्यता आहे. विधानसभा निवडणूक घोषित करण्यातील सगळ्यात महत्त्वाचा हा दौरा आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम राज्यातील प्रशासकीय यंत्रणासोबत संपूर्ण आढावा बैठक घेणार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group