रेशनकार्ड  वितरण  विभागाने  घेतला ''हा'' मोठा निर्णय
रेशनकार्ड वितरण विभागाने घेतला ''हा'' मोठा निर्णय
img
दैनिक भ्रमर
नाशिक :  जिल्ह्यात पिवळे केशरी व पांढरे रेशन कार्ड धारकांची संख्या एकूण 150 लाख 58 हजार इतकी आहे. रास्त भाव दुकानदारा मार्फत त्यांना धान्य वितरण केले जाते. राज्यात एकूण 52 हजार हजार 532 रास्त भाव दुकानदार आहे.

दरम्यान , जिल्हा धान्य वितरण कार्यालयाने नवीन रेशनकार्ड वाटप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे फक्त ऑनलाइन पद्धतीनेच  रेशनकार्ड मिळेल. रेशनकार्ड बंद झाले तरी पिवळे, केशरी कार्डधारकांना मिळणाऱ्या सुविधा सुरूच राहतील. मात्र, यापुढे अस्तित्वात असलेल्या रेशनकार्डमध्ये नाव समाविष्ट करणे, कमी करणे यासारखी दुरुस्तीची कामे ऑफलाइन पद्धतीनेच होतील.

अंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंब रेशन कार्डधारकांना सरकारकडून आनंदाचा शिधा दिला जातो. तसेच पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना राज्य सरकारकडून उत्पादनाच्या दाखल्यातून सूट दिली आहे. यामुळे जिल्ह्यात दोन महिन्यात तब्बल 16 हजार रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती करण्यात आली. यात नाव समाविष्ट करणे किंवा कमी करणे यांसारख्या कामांसाठी महिलांनी गर्दी केली होती. त्यामुळे ऑनलाईन कार्ड वितरणाची केंद्रस्तरीय प्रणाली आरसीएमएस बंद पडली होती. त्यामुळे जिल्हा कार्यालयास अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

दरम्यान, ऑनलाईन प्रणाली अधिक सक्षम झाल्यावर नागरिकांना रेशन कार्डच्या संदर्भातील कामांसाठी जिल्हा धान्य वितरण कार्यालय येण्याची आवश्यकता भासणार नाही. ऑनलाईन अर्जाच्या आधारे आधारकार्ड प्रमाणेच स्वतःला रेशन कार्डची प्रिंट काढता येणार आहे.

असा मिळतो योजनेचा लाभ

अंत्योदय कार्डधारक : शिधापत्रिका धारकांना महिन्याला एकूण ३५ किलो धान्य मिळते. यात गहू १५ किलो, तांदूळ २० किलो दिले जातात.

 शिधापत्रिका धारकांची संख्या

पिवळे कार्ड
 १) बीपीएल- ३,२३,७७८ 
२) अंत्योदय- १,७६,७४१ 

केशरी 
-प्राधान्य कुटुंब- ३,५६,८१९ 
-बिगर प्राधान्य- ५,९६,६७७ 

शुभ्र (पांढरे) १०४८२०
 एकूण=१५,५८,८३५

इतर बातम्या
Join Whatsapp Group