'स्त्री 2' ची  बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई !
'स्त्री 2' ची बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई !
img
दैनिक भ्रमर
‘स्त्री 2’  हॉरर कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय. 15 ऑगस्टला रिलिज झालेला हा सिनेमा पहिल्याच दिवसापासून बक्कळ कमाई करताना दिसला. या चित्रपटात अभिनेत्री श्रध्दा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव हे प्रमुख भूमिकेत आहेत . 

‘स्त्री 2’ रिलीज होऊन दहा दिवस झाले. दहाव्या दिवशीही चित्रपटाची जादू कायम आहे. प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी खूप उत्साह पहायला मिळत आहे. दमदार कलेक्शनसह चित्रपटाने भारतात 361 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ‘स्त्री 2’ 10 व्या दिवसाच्या कलेक्शनसह 350 कोटी क्लबमध्ये सहभागी झालाय. चित्रपट दररोज नवे रेकॉर्ड करताना दिसत आहे. त्यामुळे चित्रपट आता लवकरच 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल असा अंदा वर्तवला जातोय.

359 कोटी या मजबूत कलेक्शनसह ‘स्त्री 2’ ने बॉलिवूडपासून साऊथच्या अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपटांना मागे सोडलं आहे. बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री 2’ जलवा कायम असून छप्पर पाड कमाई सुरु आहे. कलाकारांच्या अभिनयापासून हॉरर कॉमेडी ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group