इंडिगो विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, नागपुरात आपत्कालीन लँडींग
इंडिगो विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, नागपुरात आपत्कालीन लँडींग
img
दैनिक भ्रमर

जबलपूरहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला रविवारी (१ सप्टेंबर) बॉम्बची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. सुरक्षेच्या कारणास्तव हैदराबादला जाणाऱ्या विमानाचं नागपुरात आप्तकालीन लँडींग करण्यात आले, इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढल्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली. मात्र, विमानात कोणतीच संशयित वस्तू आढळून आली नाही. दरम्यान, पोलीस आता धमकी देणाऱ्याचा शोध घेत आहेत. जबलपूरहून हैदराबादला जाणारे फ्लाइट ६E ७३०८  मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली. त्यानंतर हैदराबादला जाणारे हे विमान नागपूरला वळवण्यात आले. नागपुरात सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून विमानाची तपासणी करण्यात आली.

दरम्यान , बॉम्बची धमकी एका कागदाच्या तुकड्यावर मिळाली. हा कागद विमानाच्या बाथरुममध्ये मिळाला. त्यामुळे विमान नागपूरला उतरवून सुरक्षा एजन्सीने कठोर तपासणी केली. त्यात काहीच आक्षेपार्ह मिळाले नाही. त्यानंतर दुपारी दोन वाजता विमान हैदराबादकडे रवाना करण्यात आले.

जबलपूर येथून हैदराबाद येथे जाणारी फ्लॉइट  ६E ७३०८  मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी रविवारी मिळाली. त्यानंतर हैदराबादकडे निघालेले हे विमान नागपूर विमानतळकडे डायवर्ट करण्यात आले. नागपूर विमानतळावर विमानाचे आप्तकालीन लँडींग करण्यात आले. त्यानंतर सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. विमानाची तपासणी करण्यात आली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group