मोठी  बातमी !  ''हा'' पक्ष स्वबळावर लढवणार विधानसभा निवडणूक , पाच उमेदवारांची नावे जाहीर
मोठी बातमी ! ''हा'' पक्ष स्वबळावर लढवणार विधानसभा निवडणूक , पाच उमेदवारांची नावे जाहीर
img
दैनिक भ्रमर

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक मोठमोठ्या घडामोडी होत आहेत.  काही पक्षात नेत्यांचे पक्षांतर, काही पक्षात उमेदवारी वरून शर्यत तर काही पक्षात युती अशा अनेक  छोटे मोठे बदल बघायला मिळत आहेत . दरम्यान , 

याच पार्श्वभूमीवर काही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे . एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनीही कोणत्याही आघाडीत न जाता स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर त्यांनी पाच उमेदवारांच्या नावांची घोषणाही केली आहे.  एमआयएमचे सर्वेसर्वा आणि खासदार असदुद्दीन ओवैसी आज संभाजीनगरमध्ये होते. यावेळी त्यांनी आघाडीच्या नेत्यांशी चर्चा झाली. पण त्यांनी नंतर काहीच कळवलं नाही. त्यामुळे आम्ही अधिक वाट न पाहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, असं असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितलं. त्यामुळे एमआयएमचा महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एमआयएमने सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. आम्हाला आघाडीत घ्या म्हणून आघाडीला वारंवार विनंतीही केली. पण आघाडीने त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे एमआयएमने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी साथ दिली होती. आता हा व्होटर एमआयएमकडे वळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

दरम्यान , असदुद्दीन ओवैसी यांनी यावेळी पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. संभाजीनगरमधून इम्तियाज जलील, धुळ्यातून फारूक शाह, मालेगावमधून मुफ्ती इस्माईल, मुंबईतून रईस लष्करीया, सोलापूरमधून फारूक शाब्दी निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. इतर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे नंतर जाहीर केली जाणार आहेत, असंही ओवैसी यांनी सांगितलं.

इतर बातम्या
Join Whatsapp Group