पिंपरी चिंचवड हादरलं: भीषण स्फोटात, चार स्कूल बस जळून खाक
पिंपरी चिंचवड हादरलं: भीषण स्फोटात, चार स्कूल बस जळून खाक
img
Dipali Ghadwaje
पिंपरी- चिंचवडमधील ताथवडे येथे जेएसपीएम विद्यालयाच्या परिसरात अचानक तीन ते चार स्कूल बसला आग लागल्यानं मोठे स्फोट घडले आहेत. यामुळे नजीकच्या परिसरात एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळाले. या घटनेत चार स्कूल बस आणि एक टँकर जळल्याची माहिती समोर आली आहे. 

शहरातील ताथवडे परिसरात पुणे-बँगलोर महामार्गावर रविवारी रात्री एका टँकरला भीषण आग लागली. प्रोपिलीन गॅस भरलेल्या या टँकरला आग लागली. आगीने रौद्र रुप धारण केल्यानंतर गॅसने भरलेल्या सिलिंडरचेही स्फोट झाले. त्यामुळे रात्रभर नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण होतं.

याबाबत माहिती मिळताच वाकड, हिंजवडी, रावेत परिसरात गस्त घालणारे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाच्या गाड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग पूर्णपणे नियंत्रणात आणली.  

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ताथवडे परिसरातील जेएसपीएम महाविद्यालयाजवळ मे. तिरूपती करियरचे 21 टन क्षमतेच्या प्रोपिलीन गॅसची अवैधरित्या भरणा घरगुती 14.2kg आणि कमर्शियल सिलेंडरमध्ये करण्यात येत होता. यामध्ये गॅसची गळती झाल्यानंतर आग लागली असावी. त्यानंतर भीतीपोटी कार्यरत कर्मचारी घटनास्थळावरुन पळून गेले असावे. दरम्यान या घटनेत कुणीही जखमी झाल्याची माहिती नाही. 

मात्र या आगीत जेएसपीएम महाविद्यालयाजवळ उभ्या असलेल्या  महाविद्यालयाच्या  तीन ते चार स्कूल बसेस पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पिंपरी, थेरगाव, प्राधिकरण, राहटणी, चिखली, भोसरी,तळवडे अग्निशमन पथके त्याचप्रमाणे हिंजवडी MIDC आणि PMRDA चे कर्मचारी देखील मदतीसाठी धावून आले होते. आग पूर्णपणे विझली असून कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group