''स्त्री 2'' चं  बॉक्स ऑफिसवर जोरदार कलेक्शन, केली 'इतकी' कमाई
''स्त्री 2'' चं बॉक्स ऑफिसवर जोरदार कलेक्शन, केली 'इतकी' कमाई
img
दैनिक भ्रमर

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाने  बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. एक महिन्यातच  स्त्री 2' या चित्रपटाने छप्परफाड कलेक्शन  केले आहे.15 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने चाहत्यांना एकच भुरळ पाडली आहे . दररोज 'स्त्री 2' चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होत आहे. 

 सध्या हा चित्रपट 600 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या शर्यतीत आहे. आज 'स्त्री 2' चित्रपटाला रिलीज होऊन एक महिना झाला आहे. अशा परिस्थितीत आता चित्रपटाचे शनिवारचे आकडे समोर आले आहेत. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांच्या अभिनयानेही चाहत्यांची मने जिंकली आहेत. 

पहिल्या दिवशी 'स्त्री 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 51.8 कोटी रुपयांची कमाई केली होती. एवढेच नाही तर 'स्त्री 2' चित्रपटाने 'बाहुबली 2', 'पठाण', 'टाइगर जिंदा है' आणि 'गदर 2' सारख्या अनेक मोठ्या चित्रपटांना देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर मागे टाकले आहे.



इतर बातम्या
Join Whatsapp Group