"सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच" , समीर भुजबळ विधानसभेच्या रिंगणात? काका छगन भुजबळांची जोरदार टोलेबाजी
img
Dipali Ghadwaje
राज्यातील राजकारणात काका पुतणे नेहमी चर्चेत राहिले आहे. बाळासाहेब ठाकरे-राज ठाकरे, शरद पवार-अजित पवार ही राजकारणातील काका पुतण्यांची जोडी राज्यभर नाही तर देशभर प्रसिद्ध आहे. आता नशिकमध्ये काका पुतण्यांची चर्चा जोरात सुरु आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या पुतण्या समीर भुजबळ यांनी नांदगावमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावर छगन भुजबळ यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. ते म्हणाले, सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच आहे, असे मला वाटते. पुतणे काकांचे ऐकत नाही, असे वाटत आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, शरद पवार यांचे पुतणे, अजित दादांचे पुतणे आणि गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे, बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे हे सर्व काकांचे ऐकतच नाही, असे वाटते. राजकारणात सगळे पुतणे सारखेच आहेत. त्यांचा  डीएनए वेगळाच आहे, असे मला वाटायला लागले आहे.

यावेळीराजकारणातील घराणेशाहीबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, वडिलांच्या विरुद्ध मुलगी निवडणूक रिंगणात आहे. वडील एका पक्षात आहेत, मुले दुसऱ्या पक्षात आहे, हा प्रकार सर्रास दिसते आहे.

बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे पुतणे निवडणूक रिंगणात आहे. त्यावर ते म्हणाले, पहिलीपासूनच बारामतीची वाटणी केलेली आहे, असे माझे स्वतःचे मत आहे. दिल्लीमध्ये सुप्रियाताई आणि महाराष्ट्रमध्ये अजित पवार ही वाटणी पवार साहेबांनीच केली. बारामतीच्या लोकांनी ती स्वीकारली आहे. या ठिकाणी विकास आणि अनेक गोष्टी अजितदादांनी केल्या आहेत.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group