आवडती-नावडती बहीण असं करू नका , तर .... ; महायुती सरकारकडे उद्धव ठाकरेंनी केली
आवडती-नावडती बहीण असं करू नका , तर .... ; महायुती सरकारकडे उद्धव ठाकरेंनी केली "ही" मोठी मागणी ?
img
Dipali Ghadwaje
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरे आज नागपूरमध्ये आले आहेत. यावेळी आवडती-नावडती बहीण असं करू नका, निकष बाजूला ठेवा. निकष न पाहाता लाडक्या बहि‍णींना तात्काळ २१०० रूपये द्या, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारकडे केली आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.

यावेळी ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. दरम्यान ईव्हीएमवरूनही ठाकरेंनी घणाघाती टीका केली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे 

लाडक्या बहीण योजनेचे पैसे देताना आवडती, नावडती करू नका. निकष न पाहता सरसकट २१०० रूपये जमा करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारकडे केली. नाराज सुधारले तर बघूयात. २०१९ चा अनुभव माझा गुरू आहे, असे म्हणत ठाकरेंनी बंडखोर नेत्यांबाबत मवाळ भूमिका घेतली. नाराजांना आता आमची भूमिका पटतेय, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आमचे २० आमदार पुरेशे आहेत, असा टोला उद्धव ठाकरेंनी विरोधकांच्या संख्याबळावरून लगावला. विस्तार झाला मात्र अजून खातेवाटप झाले नाही. बिन खात्याच्या मंत्र्यांवर काय जबाबदारी आहे. गंमत म्हणून अधिवेशन असल्यास लोकशाहीची थट्टा आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group