वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावर नितेश राणे पुन्हा आक्रमक, नक्की काय म्हणाले ?
वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावर नितेश राणे पुन्हा आक्रमक, नक्की काय म्हणाले ?
img
दैनिक भ्रमर
राजकारणातील घडामोडींना वेग आला असून भाजप मंत्री नितेश राणे हे निरनिराळ्या मुद्द्यांवर आपले मत मांडताना दिसत असतात. काही दिवसांआधीच त्यांनी दहावी आणि बारावी परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त व्हावी यासाठी परीक्षेला जाताना बुरख्यावर बंदी घालावी अशी मागणी केली होती. याचदरम्यान आता पुन्हा एकदा ते राज्यात वक्फ बोर्डाच्या आणि  परीक्षा पारदर्शक व्हावी याविषयावर  पुन्हा एकदा संपताप व्यक्त केला आहे. 

राज्यात लवकरच दहावी, बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे, परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त व्हावी यासाठी परीक्षेला जाताना बुरख्यावर बंदी घालावी अशी मागणी करणारं पत्र काही दिवासंपूर्वी मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दिलं होतं. मात्र नितेश राणे यांच्या या मागणीला विरोध होत आहे.  तसेच राज्यात वक्फ बोर्डाच्या जमिनीचा मुद्दा देखील चांगलाच तापला आहे, या दोन्ही विषयांवर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आपली आक्रमक भूमिका मांडली आहे. ते श्रीगोंदा येथे बोलत होते.

जिहाद्यांचा या उन्माद आहे, त्यामुळे हिंदू समाजातील लोकांना धीर देण्यासाठी ताकद देण्यासाठी मी इथं आलो आहे. हे सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे,  हिंदूंच्या ताकदीने हे सरकार स्थापन झालं आहे. या सरकारच्या काळात हिंदुवर झालेला अन्याय सहन करणार नाही, असा इशारा यावेळी नितेश राणे यांनी दिला आहे.  दरम्यान सध्या राज्यात वक्फ बोर्डाच्या जमिनीचा मुद्दा देखील चांगलाच तापला आहे. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी म्हटलं की,  ‘पीर बाबाची नाटकं कशाला पाहिजेत? पैगंबर यांना मानणारा मुळ मुस्लिम जमाज देखील पीर बाबाला मानतो का? वक्फ बोर्डाचा विषय आमच्याकडे आहे. ही आमची राज्य सरकार व केंद्र सरकारची भूमिका आहे’, असं राणे यांनी म्हटलं आहे.

तसेच ,  दहावी, बारावीच्या परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त व्हावी यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र दिलं आहे. सरकार आमचं आहे, सरकारचा मी प्रतिनिधी आहे. आमचा कारभार हा पारदर्शक व्हावा असा आमचा प्रयत्न असल्याचं यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं आहे. बांगलादेशी कीड देशात ठेवणार नाही, त्यांना जे दूध पाजणारे आहेत, त्यांनाही आम्ही ठेचू असंही यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group