शिवसेनेचे पालघरचे पदाधिकारी अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. तब्बल ११ दिवसांनी अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला. ध्या याप्रकरणी विविध खुलासे समोर येत आहेत. आता अशोक धोडी यांच्या हत्येप्रकरणी राजस्थान कनेक्शन उघड झाले आहे. दरम्यान, आता या प्रकरणी आजून एक मोठीअपडेट समोर आली आहे. आता अशोक धोडी यांच्या हत्येप्रकरणी राजस्थान कनेक्शन उघड झाले आहे.
अशोक धोडी हत्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपींची स्कॉरपिओ गाडी पालघर पोलिसांच्या हाती लागली आहे. या गाडीचा वापर मुख्य आरोपी अविनाश धोडी वगळता अन्य दोन आरोपींनी फरार होण्यासाठी केला होता. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातून पालघर पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
राजस्थानमधील फरार आरोपीने ताब्यात घेतलेल्या गाडीतून त्याची पत्नीला घेऊन आपल्या मित्राच्या घरी सोडले. त्यानंतर ती गाडी त्याच मित्राच्या घरी लावून तेथून दुसऱ्या गाडीने फरार झाल्याचे पाहायला मिळत आहे. तब्बल १६ दिवसांनी फरार आरोपींची स्कॉर्पिओ कार पोलिसांनी राजस्थानमधून हस्तगत केली आहे. पोलिसांनी राजस्थान येथील पाली जिल्ह्यात जाऊन ही स्कॉर्पिओ कार ताब्यात घेतली आहे.
अशोक धोडी अपहरण आणि हत्येप्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 3 आरोपी हे फरार आहेत. यात त्यांचा सख्खा भाऊ अविनाश धोडीचा समावेश आहे. या फरार आरोपींच्या तपासासाठी पालघर पोलिसांच्या 6 टीम राजस्थान, पाली, पालघरच्या विविध भागात तपास करीत आहेत.
दरम्यान , गुजरातमधील भिलाड पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या सरिग्राम येथील एका बंद दगड खाणीच्या पाण्यात 40 फूट खोल त्यांची गाडी सापडली. याच गाडीत त्यांचा मृतदेह सापडला.