शिवरायांनी आग्रा येथून सुटका करताना औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिल्याचं वादग्रस्त वक्तव्य अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलं आहे. दरम्यान , या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट आहे. छत्रपतींचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील राहुल सोलापूरकर यांच्या या वक्तव्यावर चांगलाच संताप व्यक्त करत त्यांनि सोलापूरकर याना थेट एक इशाराच दिला आहे. त्यामुळे उदयनराजे यांच्या या इशाऱ्यानंतर आता पुणे पोलीस अलर्ट मोडमध्ये आले असून राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
यांच्या शिवरायांनी आग्रा येथून सुटका करताना औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिल्याचं वादग्रस्त वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केलं आहे. दरम्यान, या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत चांगलाच संताप व्यक्त केला आहे. ‘राहुल सोलापूरकर यांना गोळ्या घालूनच मारलं पाहिजे, सोलापूरकर जिथे दिसेल तिथे ठेचा आणि त्याला गाडा, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. दरम्यान उदयनराजे यांच्या या इशाऱ्यानंतर आता पुणे पोलीस अलर्ट मोडमध्ये आले असून, पुण्यात बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.