आजकाल कोण कोणाचा कसा विश्वास घात करेल हे सांगणे शक्य नाही. त्यात नवरा बायकोच नातं म्हंटल तर ते विश्वासावरच अवलंबून असत. पण एका पत्नीने आपल्या पतीस असा धोका दिला आहे की तो आयुष्यात पुन्हा कधी कोणावरही विश्वास ठेऊ शकणार नाही. घरची परिस्थिती सुधारवण्याच्या नावाखाली महिलेने आपल्या पतीची किडनी विकली आणि मिळालेले पैसे घेऊन पळून गेली.पत्नीच्या जाळ्यात अडकून, त्याने एक वर्ष आपली किडनी विकण्यासाठी ग्राहक शोधला आणि जेव्हा त्याला खरेदीदार मिळाला, तेव्हा त्याला त्याच्या किडनीचा एकही रुपयाही मिळाला नाही.
समोर आलेल्या माहितीनुसार, , महिलेने आपल्या पतीला सांगितलं की, जर त्याने त्याची एक किडनी विकली, तर त्यांना इतके पैसे मिळतील की त्यांच्या घराची परिस्थिती सुधारेल. त्यांची 10 वर्षांची मुलगी मोठी होईल आणि तिचं शिक्षण चांगलं होईल, तसेच तिचं लग्नही चांगलं होईल. पत्नीच्या बोलण्यावर पतीचा विश्वास बसला आणि त्याने एक वर्ष आपली किडनी विकण्यासाठी ग्राहक शोधण्यात घालवलं. मानवी अवयव विकणं कायद्याचं उल्लंघन असल्यामुळे, त्याची किडनी 3 महिन्यांपूर्वी काळ्या बाजारात विकण्यात आली. त्याला 10 लाख रुपये मिळाले. इतका मोठा त्याग केल्यानंतर आपली फसवणूक होणार आहे, याची त्या व्यक्तीला कल्पनाही नव्हती.
पतीने आरोप केला आहे की, त्याची पत्नी बराकपूरमध्ये राहणाऱ्या तिच्या प्रियकराला फेसबुकच्या माध्यमातून भेटली होती आणि दोघांनी मिळून त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले. पतीने पोलिसांच्या मदतीने पत्नीला शोधलं आणि मुलीसोबत तिला परत आणायला गेला. कुटुंब समोर पाहून पत्नीने दरवाजा बंद केला आणि घटस्फोटाची धमकी देऊ लागली. पत्नीने पतीवर त्रास दिल्याचा आरोप करत घटस्फोट मागितला आहे. सध्या, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे.