लाच घेताना मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
लाच घेताना मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
img
दैनिक भ्रमर
नाशिक :- 2 हजार रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
मुकेश श्रीकांत भावसार (वय 42, रा. उत्सव मॉल मागे, शिरपूर) असे लाच घेणाऱ्या शिरपूर, जिल्हा धुळे येथील मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे.

हे ही वाचा : कारडा कन्स्ट्रक्शनचे संचालक मनोहर कारडा यांची रेल्वे खाली आत्महत्या

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर तक्रारदार व त्यांच्या बहिणीचे नाव भावसार यांनी लावून दिले होते.

त्या मोबदल्यात भावसार यांनी तक्रारदाराकडून 2,000 रुपयांची लाच मागितली. ही लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक
अभिषेक पाटील, पो नि हेमंत बेंडाळे, पोहवा राजन कदम, पोना संतोष पावरा, चालक पोहवा सुधीर मोरे यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group