5 लाखांची लाच घेताना दोघे एसीबीच्या जाळ्यात
5 लाखांची लाच घेताना दोघे एसीबीच्या जाळ्यात
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- 5 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना रंगेहाथ पकडले आहे.

रवींद्र शालिग्राम सपकाळे (वय 54,  विस्तार अधिकारी (चार्ज सहाय्यक गट विकास अधिकारी वर्ग २) पंचायत समिती जळगांव  जि.जळगांव व पद्माकर बुधा अहिरे (वय 53, विस्तार अधिकारी पंचायत समिती जळगाव, वर्ग ३) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे सुद्धा लोकसेवक आहेत. त्यांचे विरुद्ध चालू असलेल्या चौकशी समितीमध्ये रवींद्र सपकाळे व पद्माकर अहिरे हे प्रमुख असून या चौकशी मधून दोष मुक्त करून चांगला अहवाल पाठवण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

हे ही वाचा : नाशिकमध्ये फटाके फोडण्याच्या वादातून एकाचा खून
https://dainikbhramar.com/news/v/994/murder-in-nashik

सर्व शहानिशा केल्या नंतर त्यांनी सापळा रचला होता. काल अखेर 5 लाख रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांचेवर जिल्हापेठ पोलीस स्टेशन, जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पो.ना. बाळू मराठे , पो.ना. सुनिल वानखेडे, राकेश दुसाणे, एन. एन. जाधव, पोलीस निरीक्षक
स.फौ.सफौ दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.कॉ. प्रदीप पोळ, पो. कॉ.प्रणेश ठाकुर यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group