नाशिकमध्ये फटाके फोडण्याच्या वादातून एकाचा खून
नाशिकमध्ये फटाके फोडण्याच्या वादातून एकाचा खून
img
Prashant Nirantar

नाशिक :- सर्वत्र दिवाळीचा जल्लोष सुरू असताना नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. फटाके फोडण्याच्या वादातून एका युवकाचा धारधार शस्त्राने खून करण्यात आला आहे. गौरव तुकाराम आखाडे (वय ३१, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाथर्डी गावात स्वराज्य नगर येथे लक्ष्मपूजनाच्या दिवशी मयत गौरवच्या घराबाहेर शेजारी राहणारे शिंदे कुटुंबीय फटाके फोडत होते. लहान मुले डचकतात म्हणून त्यांनी फटाके मैदानात फोडण्यास सांगितले.तेव्हा काही युवकांशी फटाके उडवण्यावरून वाद झाले होते. काल पुन्हा त्यांच्यात बाचाबाची झाली.   

यातील संशयित बबनराव यादवराव शिंदे, नारायण बबनराव शिंदे यांनी रागाच्या भरात त्याच्यावर धारधार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात तो मयत झाला. पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ संशयित अजून फरार असून त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

या गुन्ह्यात एक अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे समजते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group