मोठी बातमी  : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार, काय आहे कारण?
मोठी बातमी : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार, काय आहे कारण?
img
Dipali Ghadwaje
पुण्यातील कोथरुड परिसर हा नेहमी गजबजलेला असतो. पुण्यातील उच्चभ्रू रहिवाशांचा परिसर असलेल्या कोथरूड परिसरात हा गोळीबार झाला. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात ही घटना घडली. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु गँगवार प्रकरणातून हा गोळीबार झाल्याची शक्यता आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  या घटनेत शरद मोहोळवर याला तीन गोळ्या लागल्या आहेत. त्यातील एक गोळी त्याच्या खांद्यावर लागली. त्यानंतर लागलीच शरद मोहोळ याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरुन आरोपी फरार झाले आहेत. 

दरम्यान गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांची माहिती घेतली जात आहे. 

कोण आहे शरद मोहोळ?
शरद मोहोळ पुणे येथील कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. शरद मोहोळ आणि साथीदारांनी टोळीयुद्धातून गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा खून केला होता. नीलायम चित्रपटगृहाजवळ एका हॉटेलमध्ये ही घटना घडली होती. या खून प्रकरणात त्याला अटक झाली होती. या खटल्यात जामीन त्याला मिळाला. त्यानंतर दासवे येथील सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केल्या प्रकरणात त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती. येरवडा कारागृहात असताना कतील सिद्दीकीचा त्याने खून केला होता. या खटल्यातून त्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यानंतरही त्याची गुन्हेगारी कृत्य सुरुच होती. यामुळे जुलै २०२२ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार केले होते.
pune | crime |
इतर बातम्या
Join Whatsapp Group