मोठी बातमी :  पुष्ठा बनवणाऱ्या कंपनीला आग, बॉयलर फुटल्याने आग लागल्याची माहिती
मोठी बातमी : पुष्ठा बनवणाऱ्या कंपनीला आग, बॉयलर फुटल्याने आग लागल्याची माहिती
img
दैनिक भ्रमर

नाशिकच्या मनमाड मधील नगर चौकी येथील निंबस पॅकेजिंग कंपनीला अचानक आग लागण्याची घटना घडली असून कंपनीमधील बॉयलर फुटल्याने आग लागले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आगीमुळे धुराचे प्रचंड लोट आकाशात दूरवर नागरिकांना दिसत होते,आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दल दाखल  झाले असले तरी भीषण आगीमुळे परिसरात धुराचे लोळ आकाशामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, तर आग बघण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

आग पसरत असल्याने कंपनीमधील अन्य बॉयलर फुटत असल्याने परिसरातील नागरिकांची घबराट होत होती या आगीमुळे एकूणच परिसरात दहशत निर्माण झाले आहे. मात्र या आगे मध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.

इतर बातम्या
Join Whatsapp Group