अग्नितांडव! झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत एकाचा मृत्यू .....
अग्नितांडव! झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत एकाचा मृत्यू .....
img
दैनिक भ्रमर
मुंबई  : भाईंदर पूर्वेकडील गोल्ड नेस्ट सर्कलजवळील आझाद नगर झोपडपट्टीत आज पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एकाचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

भाईंदर पूर्वेकडील आझाद नगर झोपडपट्टीला लागलेली आग अटोक्यात येत आहे. आझाद नगर झोपडपट्टीला लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर, तीन जण जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये मीरा-भाईंदर अग्निशमन दलाच्या एका जवानाचाही समावेश आहे. आज सकाळच्या सुमारास ही आग लागली होती.

पालिकेची आरक्षित जागा आहे. येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपडपट्टीचे साम्राज्य उभे राहिले होते. या आगीत 50 पेक्षा अधिक दुकाने आणि घरे जळून खाक झाली आहे.

दिपक चौरसिया असे या आगीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, दोन मुले जखमी झाले आहेत. तसेच शिवाजी सावंत हे मीरा-भाईंदर अग्निशमन दलाचे कर्मचारी जखमी झाले आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची 24 वाहने काम करत आहेत. मुंबई महानगरपालिकेचे सात बंब, ठाणे महानगरपालिकेचे 4 बंब, वसई विरार महानगरपालिकेचे 3 बंब, तर मीरा-भाईंदरचे 7 बंब आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group