काँग्रेसला आणखी एक धक्का;
काँग्रेसला आणखी एक धक्का; "या" नेत्याचा भाजपात प्रवेश
img
दैनिक भ्रमर
लोकसभा निवडणुकी पूर्वी काँग्रेसला अनेक धक्के बसत आहेत. अनेक नेते काँग्रेसला रामराम ठोकत इतर पक्षात प्रवेश करत आहेत. पुन्हा एकदा काँग्रेसला धक्का बसला आहे.

काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांची सून अर्चना पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

अर्चना पाटील यांच्या प्रवेशाने भाजप लातूरमध्ये बळकट झाली आहे. भाजप कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी अर्चना पाटील आणि उदगीरचे 7 वेळा नगराध्यक्ष असलेले राजेश नितुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अर्चना पाटील यांच्या प्रवेशाने भाजपला मराठवाड्यात अधिक बळकटी मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीमुळे देशाची प्रगती झाली आहे. मोदींनी महिलांसाठी नारी शक्ती वंदन बिल आणलं. त्यामुळे राजकारणात येण्यापासून घाबरणाऱ्या महिलांना आता राजकारणात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मोदी यांच्या या निर्णयाने प्रभावित होऊनच मी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे.

मी सोनिया गांधी आणि सुषमा स्वराज सारख्या नेत्यांना जवळून पाहिलं आहे. त्यांचं काम पाहिलं आहे. त्यांचा माझ्यावर मोठा प्रभाव पडला आहे, असं सांगतानाच तुमचे आशीर्वाद माझ्या पाठी राहू द्या, असे अर्चना पाटील म्हणाल्या.
इतर बातम्या
Join Whatsapp Group