भीषण अपघात! डंपरच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; ५ मृत्यू; ३ गंभीर
भीषण अपघात! डंपरच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; ५ मृत्यू; ३ गंभीर
img
Dipali Ghadwaje
उत्तर प्रदेशातील चित्रकूटमध्ये एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जाणारा डंपर आणि ऑटो यांची जोरदार धडक झाली. या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

याबात एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार,  या अपघातात ऑटोचा चक्काचूर झाला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. अपघातानंतर आठ जणांना रुग्णालयात आणण्यात आलं होतं. यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य तीन जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना प्रयागराज येथे रेफर करण्यात आलं आहे.

ऑटोमध्ये चालकासह एकूण आठ जण असल्याची माहिती मिळत आहे. या मृतांमधील तीन मृतदेहांची ओळख पटलेली आहे. यातील दोन मृत व्यक्ती कन्नौजचे रहिवासी आहेत आणि एक हमीरपूरचा रहिवासी आहे. पोलीस इतर दोघांची ओळख पटवत आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे.

पहाटे झालेल्या या अपघातामुळे एकच खळबळ उडाली होती.घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी ऑटोमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढून रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं. चित्रकूट कोतवाली परिसरात झाशी-मिर्झापूर राष्ट्रीय महामार्गावरील अमनपूरजवळ हा अपघात झाला. 

नेमकं काय घडले ?

आज सकाळी (२ एप्रिल) भरधाव वेगात आलेल्या डंपरने प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोला धडक दिली. ऑटोमधील पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झालेला आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी ऑटोमध्ये अडकलेल्या सगळ्या प्रवाशांना बाहेर काढलं होतं. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. जखमी झालेल्या तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलिसांनी अपघाताची माहिती मृताच्या नातेवाईकांना दिली. याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली होती. कुटुंबीय चित्रकूटला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयाच्या शवागारात ठेवले आहेत. या घटनेमुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवून हा ट्राफिक जाम मोकळा केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group