पुन्हा हिट अँड रन ; डंपरच्या चाकाखाली गेल्याने तरुणीचा जागीच मृत्यू ; कुठे घडली घटना?
पुन्हा हिट अँड रन ; डंपरच्या चाकाखाली गेल्याने तरुणीचा जागीच मृत्यू ; कुठे घडली घटना?
img
Dipali Ghadwaje
पुणे : पुण्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. पुण्यातील कोथरूडमध्ये  स्टॅन्ड समोर एका तरुणीला डंपरनं उडवल्याची घटना घडली आहे. यामध्ये या  तरुणीचा मृत्यू झाला आहे. रस्ता क्रॉस करत असताना डंपरची तरुणीला धडक दिली. यावेळी डोक्यावरून मिक्सरचा चाक गेल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला. 

कोथरुड धोंडीबा सुतार बस स्थानकासमोरची ही घटना घडली. यामध्ये तरुणी रस्ता ओलांडताना तिला डंपरची धडक बसली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला आहे. डोक्यावरून मिक्सरचे चाक गेल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला. आरती सुरेश मनवाने (वय 23) रा. एरंडे  होस्टेल भेलके नगर कोथरूड ही कोकण एक्सप्रेस हॉटेल येथून कर्वे रोडने डिव्हायडर वरून रोड क्रॉस करत होती. 

नक्की वाचा >>>> अजितदादांना धक्क्यामागून धक्के : आणखी एका नेत्याने अजितदादांची साथ सोडली

रस्ता ओलांडताना तिला डंपरची जोरदार धडक बसली. या धडकीमुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तिचे वडील सुरेश मनवाणी यांना पोलिसांनी कळवले आहे. तसेच कोथरुड पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला आहे.

नक्की वाचा >>>> भीषण अपघात : लाडकी बहीण योजना कार्यक्रमाला जाताना ; २९ महिलांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली
इतर बातम्या
Join Whatsapp Group