काँग्रसला मोठा झटका, बॉक्सर विजेंद्र सिंग याचा भाजपमध्ये प्रवेश
काँग्रसला मोठा झटका, बॉक्सर विजेंद्र सिंग याचा भाजपमध्ये प्रवेश
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची उत्सुकता वाढत चालली आहे. निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे काँग्रेसला सतत धक्के बसत आहेत. भाजपने काँग्रेसला आणखी एक धक्का दिला आहे. बॉक्सर विजेंद्र सिंग याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप नेते विनोद तावडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात त्यांना भाजपचे सदस्य केले.

विजेंदर सिंगने काँग्रेस सोडून भाजपाचं कमळ हाती घेतल्यानं काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, मथुरा लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार हेमा मालिनी यांच्याविरुद्ध काँग्रेसकडून विजेंदर सिंग यांना मैदानात उतरवले जाणार होते. मात्र, तत्पूर्वीत सिंग यांनी भाजपात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विजेंदर सिंग यांनी सातत्याने मोदी सरकारविरुद्ध भूमिका घेतली. दिल्लीतील शेतकरी आंदोलन असो किंवा महिला कुस्तीपटूंचं आंदोलन असो, विजेंदर सिंगने ट्विटरवरुन भूमिका मांडताना मोदी सरकारला लक्ष्य केलं. विशेष म्हणजे त्यांनी कालपर्यंत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या पोस्ट रिट्विट केल्या आहेत. विशेष म्हणजे मोदींना ट्रोल करणाऱ्या काँग्रेसच्या पोस्ट त्यांनी काल रिट्विट केल्या आणि आज भाजपाचा गमछा गळ्यात घातला.


देशाच्या विकासासाठी मी भाजपात प्रवेश करत असल्याचे विजेंदर सिंगने म्हटले. भाजपाच्या दिल्ली मुख्यालयात भाजपा सरचिटणीस विनोद तावडे यांच्याहस्ते विजेंदर सिंग यांचा पक्षात प्रवेश झाला. त्यावेळी, त्यांनी भाजपाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. आता, लोकसभा निवडणुकीच्या मैदानात भाजपाकडून त्यांना उतरवलं जाण्याची शक्यता आहे. 

मी पक्षांतर केलं असलं तरी चुकीला चूक आणि बरोबरला बरोबरच म्हणणार आहे. मी भाजपामध्ये सहभागी होऊन अनेक खेळाडूंच्या भवितव्यासाठी काम करणार आहे, असेही विजेंदर सिंगने म्हटले.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group