विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का, ‘हा’ आमदार भाजपाच्या वाटेवर
विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का, ‘हा’ आमदार भाजपाच्या वाटेवर
img
Dipali Ghadwaje
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या आधी देखील सर्वच पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग, आऊटगोईंग होण्याची शक्यता आहे . येत्या 2 ते 3 महिन्यांनी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. 

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली होती.राज्यात 48 पैकी 31 जागांवर महाविकास आघाड़ीचे उमेदवार विजयी झाले होते. महायुतीला फक्त 17 जागांवर समाधान मानाव लागलं होतं. लोकसभा निवडणुकीचा निकाल महायुतीसाठी एक इशारा आहे.  त्यामुळे महायुती विधानसभेची तयारी करताना काही महत्त्वाचे निर्णय घेत आहे.  

अशातच विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसचे आमदार जितेश अंतापुरकर भाजपात प्रवेश करु शकतात. भाजप नेते उपाध्याय यांच्या भेटीनंतर आमदार अंतापुरकर यांनी भाजप खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली. काल गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली. आमदार अंतापुरकर भाजपात प्रवेश करणार असल्याची नांदेड जिल्ह्यात चर्चा आहे. देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यात येतो. नांदेड जिल्हा अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला मानला जातो.


 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group