विधानसभेच्या तोंडावर कॉंग्रेसच्या अडचणी वाढणार?
विधानसभेच्या तोंडावर कॉंग्रेसच्या अडचणी वाढणार? "हे" दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर
img
DB
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसचे दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळतेय. कॉंग्रेस आमदार हिरामन खोस्कर, जितेश अंतापूरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचं समोर आलंय. 

मिळालेल्या माहितीनुसार, काल १३ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर ही भेट झाली असल्याची माहिती मिळत आहे. या आमदारांच्या भेटीचे फोटो एका वृत्त संस्थेच्या माध्यमातून समोर आले आहेत.

विशेष म्हणजे, विधान परिषद निवडणुकीत या आमदारांवर क्रॉस वोटिंग केल्याचा देखील आरोप केला होता. त्यामुळे आता हे दोन आमदार कॉंग्रेसची साथ सोडून शिंदे गटामध्ये जाणार का? हा प्रश्न निर्माण होतोय. अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगु लागल्या आहेत

विधानपरिषद निवडणुकीत कॉंग्रेसच्या पाच ते सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं. त्यावरून कॉंग्रेस या आमदारांवर कारवाई करत विधानसभेचं तिकीट कापणार, अशा देखील चर्चा सुरू होत्या. त्यामुळे आता हे दोन आमदार कॉंग्रेसची साथ सोडून शिंदे गटात जाणार का हे बघणं महत्वाचं ठरेल. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group