भीषण अपघात :  ४० जणांना घेऊन जाणारी बस झाली पलटी
भीषण अपघात : ४० जणांना घेऊन जाणारी बस झाली पलटी
img
Dipali Ghadwaje
ट्रकला ओव्हरटेक करतांना पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा नागपूर-भोपाळ महामार्गावरील बरेठा घाटाजवळ आज (शनिवारी) सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात 21 जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

या घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात पहाटे चारच्या सुमारास झाला असून , छिंदवाडा येथून ड्युटी संपवून सैनिकांनी भरलेली बस बरेठा घाटावर आली तेव्हा ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या बसला धडकली. धडकेनंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. छिंदवाडाहून राजगढला जाणाऱ्या या बसमध्ये ४० जण होते, ज्यात ३४ होमगार्ड शिपाई आणि ६ पोलीस होते. अपघातात 21 जण जखमी झाले असून 12 जणांना किरकोळ जखमींना आरोग्य केंद्र शाहपूर येथे दाखल करण्यात आले असून 9 गंभीर जखमी जवानांना जिल्हा रुग्णालयात बैतुल येथे दाखल करण्यात आले आहे.

बसमध्ये प्रवास करणारे पोलीस शिपाई अशोक कुमार कौरव यांनी सांगितले की, आम्ही निवडणूक ड्युटी करून परतत होतो, आमच्यासोबत 34 होमगार्ड आणि 6 पोलीस बसमध्ये प्रवास करत होते. वाटेत चहा पिऊन आम्ही राजगडच्या दिशेने निघालो तेव्हा बरेठा घाटात ट्रकला धडकल्यानंतर बस खड्ड्यात पलटी झाली.

एसडीओपी बैतुल शालिनी परस्ते यांनी सांगितले की, हा अपघात शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचा तपास करण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group