धक्कादायक! रिक्षाची धडक लागल्याने जाब विचारायला गेला अन्.....
धक्कादायक! रिक्षाची धडक लागल्याने जाब विचारायला गेला अन्.....
img
Dipali Ghadwaje
रिक्षाची धडक लागल्याने एका दुचाकीस्वाराने रिक्षा चालकाला रिक्षा सावकाश चालवण्यास सांगितलं . त्यामुळे संतापलेल्याला रिक्षा चालकाने वाद घालत या दुचाकीस्वाराला चक्क रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवली पश्चिम परिसरात घडली. 

या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात या रिक्षाचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा रिक्षा चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून अशा मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

नेमकं काय घडलं ?

डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखान पाडा परिसरात राहणारे विशाल जाधव हे मार्केटींगचे काम करतात. शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या पत्नीला घेण्यासाठी डोंबिवली स्टेशनला गेले होते. स्टेशनच्या दिशेने दुचाकीवरुन जात असताना मागून एका रिक्षा चालकाने धडक दिली. विशाल हे दुचाकीसह रस्त्यावर पडले. गाडी उभी करून त्यांनी रिक्षाचालकास दादा रे रिक्षा संभाळून चालव. जीव घेणार का? असं सांगितलं.

यावरुन संतापलेल्या रिक्षा चालकाने विशाल सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. या वादा दरम्यान रिक्षा चालकाने त्याच्या रिक्षातून लोखंडी रॉड काढला. या लोखंडी रॉडने विशाल यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात विशाल हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सात ते आठ टाके पडले आहेत. 

दरम्यान या घटनेनंतर रिक्षा चालक फरार झाला. रिक्षाचा नंबर विशाल यांनी विष्णूनगर पोलिसांना दिला आहे. या नंबरच्या सहाय्याने पोलीस रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत.  
 
mumbai |
इतर बातम्या
Join Whatsapp Group