देवघरात साफसफाई करीत असताना , स्टुला वरून पडल्याने एका ७५ वर्षीय आजोबांच्या पायात काहीतरी घुसल्याचे त्यावेळी त्यांना जाणविले. या वेळी पा याला झालेली जखम बरी होवून देखील पाय दुखत असल्याने त्यांनी पायाचा एमआरआय काढला असता , त्यात काहीतरी असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात मंगळ्वारीत्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या तळपायात विठ्ठलाची मूर्ती असल्याचे आढळून आले. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात मिळणाऱ्या योग्य उपचार पद्धतीमुळे हे रुग्णालय रुग्णांच्या पसंतीस उतरत आहे. त्यात सध्याच्या घडीला हे रुग्णालय मेंटल हॉस्पिटलच्या शेजारी आरोग्य विभागाच्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात सुरु आहे.
या ठिकाणी स्थलांतरीत झाल्यानंतर अनेक छोट्या मोठ्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अशातच मंगळवारी देखील एका ७५ वर्षीय आजोबांच्या तळपायाची यशस्वी शस्त्रक्रिया करत त्यांच्या पायात घुसलेली मूर्ती काढण्यात जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे.
मुलुंड पश्चिम येथे राहणारे ७५ वर्षीय आजोबा हे देवघरात साफसफाईचे काम करत असताना , चार महिन्यापूर्वी स्टुला वरून पडले, त्यावेळी त्यांच्या पायाच्या तळाव्यात काहीतरी घुसल्याने त्यांना जखम झाली होती
ती जखम पूर्णपणे बरे झाल्यानंतर देखील पाय दुखत होता . तसेच पायातून पाणी येत असल्याने त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली . त्यावेळी त्यांच्या पायाचा पहिला एमआरआय काढला त्यावेळी तो नॉर्मल आला होता .
त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा एमआरआय काढल्यानंतर काहीतरी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी अर्थोपेडीक सर्जन डॉ . विलास साळवे आणि त्यांच्या टीमने त्या ७५ वर्षीय आजोबांवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेत, अर्धातासाच्या यशस्वी प्रयत्नाने पायातून ती वस्तू बाहेर काढली . यावेळी ती लोखंडाची पट्टी नसून चक्क विठ्ठलाची मूर्ती असल्याचे समो र आले.