विधानपरिषद निवडणुकीत मनसे मैदानात; कोकण पदवीधरसाठी 'या' ...शिलेदाराला दिली संधी
विधानपरिषद निवडणुकीत मनसे मैदानात; कोकण पदवीधरसाठी 'या' ...शिलेदाराला दिली संधी
img
Dipali Ghadwaje
मुंबई : मनसेच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. विधान परिषदेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपला पहिला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. मनसे नेते अभिजीत पानसे यांना मनसेकडून कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

अभिजित पानसे हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे जुने सहकारी आहेत, त्यांनी अनेक वर्ष विद्यार्थी सेनेचं काम केलं आहे. आता त्यांना राज ठाकरे यांच्याकडून कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच राज्यात विधान परिषद निवडणुकांच्या तारखांची देखील घोषणा करण्यात आली होती. 

मात्र शिक्षक निवडणुकीच्या कर्तव्यावर असल्यानं या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला. यामध्ये कोकण व मुंबई पदवीधर तसेच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदासंघातून निवडणुकीसाठी आता निवडणूक आयोगाकडून नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

सुधारीत निवडणूक कार्यक्रामानुसार या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 31 मे पासून सुरुवात होणार आहे, शेवटची तारीख 7 जून असणार आहे. 10 जून रोजी अर्जाची छाननी होईल, बारा तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. तर 26 जूनला मतदान होणार असून,  एक जुलै रोजी निकाल लागणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group