IIT बॉम्बेच्या ८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १.२० लाखांचा दंड ; 'हे' आहे कारण
IIT बॉम्बेच्या ८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १.२० लाखांचा दंड ; 'हे' आहे कारण
img
Dipali Ghadwaje
मुंबई : आयआयटी मुंबईच्या आठ विद्यार्थ्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. संस्थेच्या वार्षिक कला मोहत्सवात रामायणावर आधारित नाटकातील मुख्य पात्राला अपमानित पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यासंदर्भात काही विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती. हा प्रकार संस्थेच्या वार्षिक कला महोत्सवात घडला होता.

या वर्षी मार्चमध्ये हा कार्यक्रम झाला होता. 'राहोवन' नावाचं नाटक या विद्यार्थ्यांनी सादर केलं होतं. पदवीचं शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला १ लाख २० हजार रुपयांचा दंड तर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शिस्तभंग कृती समितीच्या शिफारशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या आठ विद्यार्थ्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.



इतर बातम्या
Join Whatsapp Group