आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेचा उमेदवार ठरला?
आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेचा उमेदवार ठरला?
img
Dipali Ghadwaje
मुंबई लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील पक्षांनी विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. एकीकडे लोकसभेतील पराभवाचे विश्लेषण सुरु असताना विधानसभेचा आखाडा ठरवला जात आहे. बड्या नेत्याविरोधात चर्चेतील उमेदवार उतरवण्याची चाचपणी सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत.  दरम्यान शिवसेना उबाठामधील दिग्गज नेते आदित्य ठाकरे यांना पराभूत करण्यासाठी महायुतीने तयारी सुरु केली आहे. आदित्य ठाकरे विरोधात वरळी विधानसभेतील उमेदवार ठरला आहे. 

मनसैनिकांनीही वरळी विधानसभा मतदारसंघात तयारी सुरु केली आहे. मनसैनिकांनीही बॅनरबाजीतून थेट वरळीचा उमेदवार जाहीर केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

वरळीत मनसैनिकांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात जोरदार फिल्डिंग लावली आहे. मनसेने आदित्य ठाकरे यांच्या विरोधात पोस्टरबाजी केली आहे. मनसैनिकांनी विधानसभेत आदित्य ठाकरेंना पाडण्याची भाषा सुरु केली आहे. वरळीत मनसैनिकांनी संदीप देशपांडे यांचे बॅनर लावले आहेत.

वरळीत मनसे कार्यकर्ता हर्षल खरात यांनी संदीप देशपांडे यांच्यासाठी बॅनरबाजी सुरु केली आहे. मनसैनिकांनी वरळीत विधानसभेसाठी संदीप देशपांडे यांना जिंकवण्याचा निर्धार केला आहे. मनसेकडून वरळीत संदीप देशपांडे यांचं नाव पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group